बाळ बोठेला मदत करणारी ती महिला झाली फरार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्यां रेखा जरे त्यांच्याकडून आपली बदनामी होईल या भीतीने बाळ बोठे याने खून केल्याचे तपासात समोर आले असुन बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

भल्या सकाळी ही कारवाई करण्यात आली. रुममध्ये बोठे एकटाच होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली,

तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) ही महिला फरारी आहे. बोठे याला नगरमधून मदत करणारा महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) याला आज सकाळी अटक करण्यात आली.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केली होती.

यातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे हे फरार होते. त्यांचा तपास तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना लागला असून त्यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe