घरातील सदस्य विवाहसमारंभात व्यस्त कामगार महिलेने केले काम मस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- घरातील सर्वजण लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याचे तसेच इतर कामामध्ये व्यस्त असल्याची संधी साधून कामगार महिलेने घरातून तब्बल अडीच लाखांची रक्कम लंपास केली.

याबाबत हर्षल नरेंद्र शेकटकर (रा.भराडगल्ली चितळेरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना गवळी (रा.तोफखाना) या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, येथील चितळेरोड परिसरातील व्यावसायिक शेकटकर हे त्यांच्या कुटंबासमवेत दि.२१ रोजी सकाळीच लग्न समारंभासाठी गेले होते.

त्यानंतर ते २२ रोजी परत आले व २३ फेब्रुवारी रोजी परत व्यवसायाच्या कामानिमित्त सातारा येथे गेले.तेथील काम आटोपून ते दि.२८ रोजी सायंकाळी परत घरी आले.

या काळात त्यांच्याकडे कामगार म्हणून असलेली महिला तिच्या वेळेत येवून काम करत होती. दि.१ मार्च रोजी शेकटकर यांना व्यापाराचे पैसे द्यावयाचे असल्याने त्यांनी घरात असलेल्या लाकडी कपाटाच्या ड्रावरमध्ये ठवेलेले पैसे पाहीले मात्र त्यांना या ड्रावरमध्ये पैसे मिळून आले नाही.

त्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कल्पना गवळी या महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोसई मेढे हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News