अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- हिवरे बाजारचे उपसरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे.
कोरोनाला हद्दपार करणारा हिवरे बाजार पॅटनॆ ची पंतप्रधान मा.श्री.नरेद्नजी मोदी साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दखल घेऊन कौतुक केले.
हिवरे बाजार हे संपूर्ण गाव कोरोनामुक्त करून विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी देशात प्रथमच ऑफलाईन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु केले.
या विशेष योगदानाबद्दल सर्टिफिकेट ऑफ कमीटमेंट या सन्मानपत्राने त्यांना गौरविण्यात आले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन चे भारतीय राष्ट्रीय महासचिव डॉ.दिपक हारके यांनी हिवरे बाजार येथे येऊन पद्मश्री पोपटराव पवार व ग्रामस्थांना सन्मानित केले.याप्रसंगी हिवरे बाजारचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम