गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-किरकोळ कारणातून अनेकदा मोठं मोठे गुन्हे, तसेच धक्कादायक घटना घडल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील.

असाच एक किस्सा नगर जिल्ह्यात घडला आहे. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब बबन मगर रा. ससेवाडी ता, नगर हा जखमी झाला आहे.

त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकाश कोठुळे, प्रतिक कांबळे, वैभव बोरुडे, शुभम भाकरे, महेश वैद्य,

व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe