अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- घरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता, व अचानक काही वादजन्य परिस्थिती निर्माण झाली व बघता बघता घरात उपस्थित एका तरुणाने विवाहित महिलेवर थेट शस्राने हल्ला केल्याची घटना घडली.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार शिर्डी मध्ये घडला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी येथील स्वामी विवेकानंद नगरात राहणारे भाटे कुटुंबियांचा लग्नाचा वाढदिवस होता, त्यानिमित्त सायंकाळी वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या राहत्या घरी एक युुुवक उपस्थित होता.
यादरम्यान त्यांच्यात काही वाद झाल्याने त्या युवकाने भाटे कुटुंबियांवर धारदार शस्राने वार करून स्वतःवरही वार केले. जखमी झालेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान महिलेवर तातडीने उपचार केल्याने तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मात्र युवकाला जास्त इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा सुरू होती.
पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम