अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- तंत्रज्ञांनाचा उपयोग माणूस ज्ञान आत्मसात करण्यासाठी करत असतो. मात्र काही कुरापती असलेले व्यक्ती याचं माध्यमातून विघातक गोष्टी घडवतात.
असाच काहीसा प्रकार एका तरुणाने केला आहे. पंचवीच वर्षीय या तरुणाने चक्क यू-ट्यूबचे व्हिडीओ बघून चक्क बॉम्ब तयार केला.
पण तो निकामी कसा करायचा याची माहिती नसल्याने त्याने तो जिवंत बॉम्ब पिशवीत टाकून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले.
बऱ्याच परिश्रमानंतर बॉम्ब निकामी करण्यात आला. राहुल युवराज पगाडे (२५) असे या ‘काडीबाज’ आरोपीचे नाव आहे. नंदनवन ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात तो राहतो.
यू-ट्यूबवर बॉम्ब कसा बनवायचा, याचे त्याने व्हिडीओ बघितले आणि त्याच्या डोक्यात बॉम्ब बनविण्याचा विचार आला.
त्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट, तसेच इतर साहित्य जमविले आणि बॉम्ब तयार केला. बॉम्ब तयार तर झाला, आता तो निकामी कसा करायचा, असा प्रश्न त्याला पडला.
ते तंत्र त्याला अवगत नव्हते. यामुळे अखेर त्याने एका थैलीत हा जिवंत बॉम्ब ठेवला व तो सरळ नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला.
त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. त्याने शांतपणे पिशवीतून बॉम्ब काढला आणि पोलिसांपुढे ठेवला.
जिवंत बॉम्ब पुढ्यात बघून ठाण्यात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला माहिती देऊन ठाण्यात बोलावून घेतले.
पथकाने बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट बॅटरीपासून वेगळे केले व बॉम्ब निकामी केला. आरोपी राहुल पगाडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम