अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात दोघांनी मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी नहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) या पीडित तरुणाने फिर्याद दिली असून स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मंगेश विजयसिंग चौर, महेश गोविंद मिसाळ (रा. डावरे गल्ली, नगर) असे आरोपींचे नाव आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की,
नहुश पडतुरे व मधुकर भुतकर हे सावेडीतील गुरूदत्त लॉन येथे गप्पा मारत असताना नहुशला आरोपीने फोन केला व म्हणाले, तुमच्या फ्लॅटचे थकलेले 15 हजार रूपये भाडे देतो, असे म्हणत बुर्हाणनगर शिवारातील स्मशानभूमी जवळ नेले.
त्याठिकाणी आरोपींनी नहुशला लाथाबुक्कांनी व दगडाने मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम व सोन्या- चांदीच्या वस्तू काढून घेतल्या. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम