….त्यांची दुकाने तातडीने सील केली जाणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असून या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात लक्षणीय व चिंताजनक आहे. करोनाचा वाढता कहर लक्षात घेता

प्रशासनाने गुरुवारी (दि. 18) पाथर्डी नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच व्यापार्‍यांनी तेथील कामगार, ग्राहकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगसह इतर करोना संदर्भातील नियमांचे पालन करावे.

याचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने तात्काळ सील केली जातील. रस्त्यावर विनाकारण व बेजबाबदारपणे फिरणार्‍या वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

करोना संबंधित शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण लॉकडाऊन पर्याय नसला तरी नियमांची कडक अंमलबजावणी निर्बंध लावणे गरजेचे आहे.

आपल्या शहरात बाहेरगावहून कोण येतंय, लग्न सोहळे व इतर गर्दीचे उत्सव यावर लक्ष ठेवणे हे गरजेचे काम लोकप्रतिनिधींनी करावे, असे आवाहन बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांनी केले.

मागील आठवड्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोनाची दुसरी लाट येत असल्याचे संकेत मिळत आहेत. रुग्णांना उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe