अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
यातच केडगांव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्ये मोठया प्रमाणात लोकवस्तीचा विस्तार झाला आहे.
गेल्या महिन्याभरापासून केडगांव मध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर दुर्देवाने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे; केडगांव मधील नागरिक मळयांमध्ये मोठया प्रमाणात राहत असून एकच आरोग्य केंद्र असून या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे.
या ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भिती आहे.
तरी केडगांव देवी परिसरामध्ये दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आयुक्त श्री.शंकर गोरे माजी स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|