अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- 2020 हे वर्ष कोरोना आला, कोरोना झाला तरी आपण सर्व जण लढलो 2021 मध्ये तरी कोरोना जाईल, असे वाटले पण पुन्हा आठवडा भरापासून रुग्ण संख्येत वाढ होत असून, आता सबका मालिक एक आपले साईबाबांनाच कोरोनाचा नायनाट करावा लागेल, त्यासाठी त्यांना शरण गेल्याशिवाय पर्यायच नाही, असे भावनिक उद्गार साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल त्र्यंबके यांनी काढले.
संस्थापक अध्यक्ष श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते आरती करुन भक्तांनी साईबाबांच्या चरणी लीन होत कोरोना जाऊ द्या अशी प्रार्थना केली. यावेळी साई-भक्तांनी देखील बाबांना दंडवत घालून कोरोनाचे संकट लवकर दूर करा, अशी प्रार्थना केली.

पुढे बोलतांना श्री. त्र्यंबके म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून साई मंदिरात शेवटच्या गुरुवारी आरती, महाप्रसाद, भजनसंध्या असे कार्यक्रम सुरु होते. मात्र कोरोनामुळे नियमानुसार महिला दिन,
भजनसंध्या कार्यक्रम रद्द करुन फक्त आरती व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे संकट दूर होताच पुर्वीप्रमाणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी सचिव योगेश पिंपळे म्हणाले की, संदेशनगरमध्ये शिर्डीप्रमाणे साईबाबांचे मंदिर उभारले महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अनेक मान्यवर व्यक्तींच्या हस्ते महाआरती, महाप्रसादासाठी अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित राहतात.
धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांचे मोठे योगदान लाभते तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहत असतात. या वेळेस प्रथमच सर्व कार्यक्रम रद्द करुन फक्त कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी भक्तांनी दंडवत घालून प्रार्थना केली, असे सांगितले.
आरती झाल्यानंतर भाविक देखील खूप भावनिक झाले होते. सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क बांधून सॅनिटायझिंग करुनच प्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|