Diabetes Control Tips : मधुमेहाच्या रुग्णांना ही 3 हिरवी पाने ठरतायेत रामबाण उपाय, खाल्ल्यास नाही वाढणार रक्तातील साखरेची पातळी

Ahmednagarlive24 office
Published:

Diabetes Control Tips : दिवसेंदिवस अनेकांची जीवनशैली बदलत चालली आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलता आहार यामुळे देशात मधुमेहच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मधुमेह हा एकमेव असा आजरा आहे ज्याने मानवाच्या खाण्यावर बंधने आणली आहेत. कारण खाण्यापासून साखरेवर नियंत्रण ठेवावे लागते. खाण्यातूनही साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मोजके पदार्थ खणायची सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.

या हिरव्या पाने ठरू शकतात रामबाण उपाय

ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, मधुमेहाच्या रुग्णांनी 3 प्रकारची हिरवी पाने खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यास खूप मदत होईल.

कोरफड

कोरफड ही खूप आरोग्यदायी आहे. त्यामुळे अनेक जण चेहरा किंवा केसांना कोरफडीचा वापर करतात. महिलांना कोरफडीकडे जास्त आकर्षण असल्याचे पाहायला मिळते. कोरफडीच्या पानातील गर काढून त्याचे जेल पिल्यास तुमच्या साखरेत पाटील नियंत्रणात राहू शकते.

बडीशेप पाने

बडीशेपची पाने खाल्ल्याने देखील तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होईल. नियमित सेवन केल्याने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

इन्सुलिन प्लांट

जर तुम्ही इन्सुलिनची वनस्पती सुमारे एक महिना रोज चघळली तर तुम्ही रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित करू शकाल. यासाठी तुम्ही या वनस्पतीची पाने अनेक दिवस उन्हात वाळवा आणि नंतर बारीक करून पावडरचा आकार द्या.

या वनस्पतीमध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक ऍसिड, बीटा कॅरोटीन, लोह, कोरोसोलिक, टेरपेनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक आढळतात जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe