मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सोयातेल आयातीवर शुल्क आकारलं जाणार ; आता सोयाबीन दरात वाढ होणारच, काय म्हणताय तज्ज्ञ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्र समवेतच देशातील बहुतांशी भागात पिकवलं जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश म्हणजे जवळपास सर्वच विभागात लागवड केली जाते. हे एक शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने आणि बाजारात कायमच चांगला दर मिळत असल्याने शेतकरी याच्या लागवडीला अधिक पसंती दर्शवतात.

खरं पाहता सोयाबीन दरात सुधारणा होण्यासाठी तसेच घसरण होण्यासाठी अनेक घटक मॅटर करत असतात. सोयाबीन दरावर जागतिक बाजारातील सोयापेंड, सोया तेल अन सोयाबीन दराचा देखील परिणाम होत असतो. एवढेच नाही तर मागणी आणि पुरवठा यावर देखील याचे दर अवलंबून असतात.

दरम्यान सध्या स्थितीला सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आज पास बाजार भाव मिळत आहे. अशातच आता उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. एक एप्रिल पासून केंद्र शासनाने सोयातील आयात शुल्क लागू केला जाणार असल्याचं सांगितले आहे. यामुळे सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे गेल्यावर्षी खाद्यतेलाचे दर आकाशाला गवसणी घालत होते. साहजिकच यामुळे देशांतर्गत खाद्यतेल भाव वाढले. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून 24 मे 2022 रोजी खाद्यतेलावरील आयात शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

शासनाकडून जवळपास दोन वर्ष 20 लाख टन सोयाबीन तेल आणि 20 लाख टन कच्च सूर्यफूल तेल आयातीसाठी आवश्यक आहे. निश्चितच यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता एक एप्रिल 2023 पासून सोयातेल आयात करण्यासाठी शुल्क आकारला जाणार आहे.

याशिवाय सोयाबीन दरवाढीसाठी चायना मधून वाढणारी मागणी, अर्जेंटीना मध्ये पडलेला दुष्काळ यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. निश्चितच आता भविष्यात सोयाबीनला काय दर मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.