उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत ६६ दिवस लग्नासाठी चांगले मुहूर्त राहतील. ज्योतिषांनुसार, मे आणि जूनमध्ये सर्वात जास्त विवाह होतील.
जुलैमध्ये देवशयनी एकादशीपासून विवाह थांबतील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशीनंतर पुन्हा सुरू होतील. चातुर्मासात मंगल कार्ये केली जात नाहीत.
दोन वर्षांपासून लग्नाच्या उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट राहिले. ज्योतिषांनुसार, नवीन वर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत लग्नाचे ६६ मुहूर्त आहेत. मात्र, यामध्ये २४ फेब्रुवारीपासून २३ मार्चपर्यंत गुरू अस्त झाल्याने तसेच १४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत अधिकमास असल्याने विवाह होणार नाहीत.
यानंतर जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत चातुर्मासामुळे विवाह थांबतील.
ज्योतिषशास्त्राचे तज्ज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, नवीन वर्षात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहिल्यास शहनाईची मंगल धूनही खूप वाजेल.
लग्नासाठी शुभ मुहूर्त
जानेवारी 22, 23, 27
फेब्रुवारी 5, 7, 18
एप्रिल 15, 17, 19, 20 ते 23, 27, 28
मे 2, 3, 4, 9, 10-13, 16-20, 25, 26, 31
जून 1, 5, 6-12, 14, 15, 16, 21, 22, 23, 26
जुलै 3 तेे 9 नोव्हेंबर 26, 27, 28
डिसेंबर 1, 3, 4, 7, 8, 9, 13, 14, 15