अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शिर्डी लोकसभेचे खासदार हे जनतेला वाऱ्यावर सोडून मिस्टर इंडिया पिक्चरमधल्या हिरोसारखे जनतेतून गायब झाले आहेत व पिक्चरमधल्या हिरोसारखे त्यांच्या ठराविक लोकांनाच ते दिसतात.
सर्व सामान्य जनतेला आपले खासदार कोरोना महामारीच्या संकटात काहीही मदत का करत नाही? असा प्रश्न पडलेला आहे. राज्यात त्यांची सत्ता असताना तसेच जिल्ह्यात त्यांचे तीन मंत्री असतांना देखील त्याचा फायदा जनतेला करून देता आलेला नाही.
त्यांना जनतेला मदत करता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली. या संकटकाळी गोरगरीब जनतेला कुठलीही मदत न करता गायब झाले.
नगर जिल्ह्याचे दक्षिनेतील खासदार हे पहिल्यादाचं निवडून आलेत तरी देखील तीन ते चार दिवसापूर्वी रेमेडेसीविल इंजेक्शन चा साठा आणून रुग्णांना मदत केली.
व जिल्ह्यातील इतर आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदार संगात मोठमोठे कोविड सेंटर उभारली तसेच इतर हॉस्पिटल ला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची देखील मदत करण्यात आली व अनेक रुग्णांचे नातेवाईकांच्या सुखादुखात सहभाग घेऊन मदत करताना दिसत आहे.
तसेच श्रीरामपुर तालुक्यात प्रथमच निवडून आलेले आमदार,नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मदत करत असल्याचे दिसत आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटा मध्ये निवडून आलेल्या खासदाराचे कुठलिही मदत शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेला झालेली नाही.
या कोरोना आजाराच्या महामारी मध्ये अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर व रेमेडीसीविर इंजेक्शन मिळत नाही,यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहे ,हे घरातील इतर नातेवाईकांना डोळ्यानी बघवत नाही.
अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अशी भयंकर परिस्थिती नागरिकांना देखवत नाही असे असताना खासदारांना लोकांवर आलेले भयंकर संकटाची काही देणेघेणे नाही असेच वाटत आहे अशा परिस्थितीत आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करणार नाही तर कधी मदत करतील असा प्रश्न जनतेला पडला आहे,
जे खासदार निवडणूक च्या वेळी घरोघरी येऊन हाता पाया पडून मतांची भीक मागत होते, तेच खासदार आजच्या संकटाच्या काळात आमच्या मदतीला का येत नाही असे विचार नागरिकांच्या मनामध्ये येत आहे.
खासदारांनी लवकरात लवकर कोरोना रुग्णांसाठी भव्य 1000 हजार,2000 हजार बेड चे कोरोना सेंटर उभारून त्यामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची मोठया प्रमाणात व्यवस्था करावी.
त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या शिर्डी मतदार संघातील नागरिकांना दिलासा द्यावे, आणि खासदाराकडून या कोरोना महामारीमध्ये नागरिकांना मदत करता येत नसेल तर
त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा दयावा जेणेकरून जनतेला त्यांच्या हक्काचा व जनतेच्या सुखा दुखात सहभाग घेणारा खासदार निवडून आणता येईल, असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी म्हंटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|