पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सडेतोड आणि रोखठोक बोलणारी त्यांची शैली अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक वेळा अजित पवार हे चालू सभेत किंवा कार्यक्रमात अधिकाऱ्यांना झापताना सर्वांनी पहिले आहे.
तसेच अनेक वेळा अजित पवार विनोद करून सर्वांना हसवतही असतात. असाच एक प्रत्यय पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात आला आहे. अजित पवार एका महिला सरपंचांना (Women Sarpanch) मिश्कीलपणे बोलतात.

अजित पवार म्हणतात, या सरपंच तर माझ्याकेड रागानेच बघताहेत, मला तर निघून जाऊ वाटायला लागलं, त्यानंतर अजित पवार या सरपंचांना हात जोडत बोलतात.
ओ ताई माझ्याकेड रागाने बघू नका, माझ्यावरचा राग हिच्यावर काढा म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडे (Supriya Sule) हात दाखवतात. असे म्हणताच कार्यक्रमात सर्वत्र हशा पिकतो.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एवढं चांगलं सीबीएससी स्कूल आपण उभारतोय, पण स्टाफ त्या तोडीचा मिळाला पाहिजे. आता आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मालक झालेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष बाजूला झालेत. पहिलं आयुष प्रसादला काही सांगितलं तर म्हणायचा हा दादा करतो आता तेच जरा सदस्यांना पण सांगा. म्हणजे आम्ही यांना निवडून पण द्यायचं अन काम करा म्हणून विनंतीही करायची,
असे म्हणत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना अजित पवार यांनी सुनावल्याचे दिसून आले. तसेच आता माझ्याकडे एकजण आला दादा वीरला बँक उघडली पाहिजे.
अरे दुर्गाडे आहेत ना अध्यक्ष, ही काम घेऊन माझ्याकडे यायचं नाही. दुर्गाडे सगळ्या नियमाप्रमाणे काम चटचट जागेवर झाली पाहिजेत असेही अजित पवार यांनी दरडावून सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले, मला अजिबात पटत नाही, काम घेऊन ये मुबंईला ये पुण्याला. मी तर जागेवर काम करतो, काही लोकांना सवय असते जागेवर काम होणार असल तरी ये मुबंईला ये पुण्याला म्हणायची असा टोलाही त्यांनी लगावला आहे.