‘ते’ शिवसेनेचे खातात अन् पवारांना जागतात…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे.

राऊत शिवसेनेचे खातात आणि शरद पवारांना जागतात, असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच, राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विकोपाला राऊतच जबाबदार आहे, असा गंभीर आरोपही केला.

जे आदिवासींना तेच धनगरांना यानुसार फडणवीस सरकारने धनगरांसाठीच्या योजनेला 1000 कोटी मंजूर केले होते. पण, त्यातला एकही रुपया ठाकरे सरकारने दिला नाही, असा आरोपही पडळकरांनी केला.

ओबीसी आरक्षणाकरता फडणवीस सरकारने 23 जीआर काढले होते. याबद्दल संजय राऊत यांना काहीच माहिती नाही. त्याची अमंलबजावणी तर सोडा मुळात दिलेला निधीही परत घेतला, अशी टीकाही पडळकरांनी केली.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मते मागितली नाहीत.

कधी जातीचे राजकारण केले नाही. मोठ्या माणसांची नावे घेतली की आपले नाव मोठे होते असे पडळकरांना वाटते. पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका कायंदे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe