अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जिह्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तर रात्रीच्या अंधारात दरोड्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
अशाच एका दरोडा टाकण्याच्या प्रयत्नांत असलेल्या तिघांना श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपी सूरज पंडित शिपी (वय 21),
सचिन अण्णासाहेब ढोबळे, (वय 28), सुनील सीताराम पडघलमल, (वय 20), तिघे रा. वेताळबाबा चौक, लोणी खुर्द, ता. राहाता या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास नेवासा रोडवरील ओव्हर ब्रीजजवळ इंदिरानगर येथील खंडोबा मंदिरासमोर तिघे जण स्वतःचे अस्तित्व लपवून रस्ता लूट,
अगर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमून होते. या दरम्यान गस्त घालत असलेल्या पोलिसांना या तिघांवर संशय आला. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी लागणारे लोखंडी पाईप,
नायलॉन दोरी, मिरची पूड, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडे, 35 हजार रुपयाची एक निळ्या रंगाची मोटरासायकल क्र. एमएच 17 सीसी 1067 तसेच एक विना नंबरची लाल रंगाची मोटारसायकल असा एकूण 70,100 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काळे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यावरून वरील य आरोपींसह दोन अनोळखी इसमांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|