एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-नागापूर एमआयडीसीतील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र तो पूर्णपणे फसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी हर्षद कांतीलाल गुगळे (रा.सारसनगर,नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसीतील एल अँड टी कंपनीच्या जवळ कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम कार्डचे सेंटर आहे.

चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एटीएम मशीनच्या सिक्युरिटी लॉक तोडून एटीएममधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्यांना मशीनचा सिक्युरिटी लॉक न निघाल्याने मशीनमधील पैसे चोरीला गेले नाही.

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस नाईक दाताळ करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe