अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-सध्या एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. आता तर चोरांनी शाळात देखील चोरी करून हद्दच पार केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील शाळेच्या ऑफिसच्या सेप्टी लॉक तोडून आतील दरवाजा उघडून अज्ञात चोराने शाळेतील ४५ हजार रुपये किमतीचे दोन संगणक, तीन इन्व्हर्टर बॅटरी, इन्वर्टर संच, प्रोजेक्टर, कुलर असे साहित्य चोरून नेले.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी कल्याण दादा होन ( रा.चांदे कसारे ता.कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास जमादार कुसारे हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|