चोरट्यांनी गुरुजीलाच लुटले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- अज्ञात चोरट्यांनी प्राथमिक शिक्षकाला अडवून लुटल्याची घटना तालुक्यातील खांडगाव फाटा परिसरात मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली.

जिजाभाऊ रभाजी नेहे (रा. गणेश विहार, मालदाडरोड, संगमनेर) हे सावरगाव तळ येथे आपल्या गावाहून संगमनेराला येत असताना

खांडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा मोटरसायकलस्वरांनी नेहे यांंची मोटारसायकल अडवली.

त्यांच्याजवळील रेडमी कंपनीचा मोबाईल व गाडीची चावी काढून घेत पलायन केले. हा प्रकार समजताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.

काही नागरीकांनी चोरट्यांचा शोध घेतला; मात्र चोरटे पळून गेले होते. जिजाभाऊ नेहे यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News