अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- संगमनेर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा करण्यासाठी आणलेली 2 लाख 60 हजार रुपये रोकड अज्ञात चोरटयांनी बॅंकेसमोरून दुचाकीच्या डिक्कीतुन लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी संजय भाऊसाहेब शेजुळ (रा. ओझर खुर्द तालुका संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संजय भाऊसाहेब शेजुळ यांनी आपला ट्रॅक्टर थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी एका ठेकेदाराला भाडेतत्वावर दिलेला आहे. या ठेकेदाराने त्यांना सोमवारी दुपारी दोन लाख 60 हजार रुपयांची रक्कम घुलेवाडी येथे दिली.
शेजुळ हे ही रक्कम भरण्यासाठी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील बँक ऑफ इंडिया येथे आले. ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. उशीर झाल्याने रक्कम भरता येईल का?
अशी चौकशी करण्यासाठी ते बँकेत गेले अज्ञात चोरट्याने याचा फायदा घेत डिक्कीतून रक्कम लांबवून एका जोडीदाराच्या दुचाकीवर बसून पलायन केले. याबाबत संजय शेजुळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम