टाकळी ढोकेश्वर येथे चोरटयांनी एटीएम चोरीचा केला प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील नगर कल्याण हायवे वरील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी असणाऱ्या एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या चोरांनी एटीएम पळविण्यासाठी चार चाकी वाहनाचाही वापर केला. परंतु एटीएम अर्ध्यावर तुटल्याने व मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

दरम्यान, एटीएम मधील 28 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी, टाकळी ढोकेश्वर येथील एसबीआयच्या शाखेजवळच एटीएम आहे. चोरट्यांनी पहाटे 2 वाजेच्या सुमारास एटीएम तोडण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यांनी एटीएम तोडण्यासाठी लोखंडी तारेचा वायर रोप एटीएम मशीनला बांधून मालवाहतूक पिकपला बांधून मशिन पायापासून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशिन पूर्ण न निघता मधुनच तुटून मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.

मशिनमधील 28 लाख 29 हजार 100 रुपयांची रक्कम सुरक्षित असल्याचे देखभाल व्यवस्थापक विश्वास कसबे यानी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस पथक हजर झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले करित आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe