अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- शहरातील तृतीय पंथीय व प्रेमदान हडको येथील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) प्रवेश केला. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी तृतीय पंथीय व इतर कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या आदेशान्वये विविध पदी नियुक्त्या केल्या.
तृतीय पंथीय आघाडीच्या शहराध्यक्षपदी वर्षा रत्नपारखी, शहर उपाध्यक्षपदी समीर शेख व महिला आघाडी शहराध्यक्षपदी जयश्री हिंगे यांची नियुक्ती करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संकेत कळकुंभे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, शहर प्रवक्ता जमीर इनामदार,
उपनगर उपाध्यक्ष जावेद सय्यद, दिनेश पाडळे, फिजा पठाण, श्रुतिका हिंगे, पायल कोंडके, कल्पना सावंत, संतोष गायकवाड, दीपक म्हस्के, सुरेश जाधव, इरफान पठाण, शुभम, निलेश चौधरी, स्वप्नील कंटाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, तृतीय पंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा पुर्ण अधिकार असून, त्यांची अनेक प्रश्ने शासनस्तरावर प्रलंबीत आहेत. इतर राजकीय पक्षांनी त्यांचा फक्त मतांपुरता वापर करुन घेतला. मात्र त्यांना न्याय, हक्का पासून वंचित ठेवण्यात आले.
तृतीय पंथीयांना सन्मानाने पक्षात प्रवेश देऊन त्यांचे शासनस्तरावर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात तृतीय पंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे.
मात्र आरपीआयमध्ये सन्मानाने पक्षात प्रवेश मिळून काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे तृतीय पंथीयांनी भावना व्यक्त केली. तर इतर पदाधिकारींनी देखील पक्षाच्या संघटनात्मक व सामाजिक कार्यासाठी योगदान देण्याचे स्पष्ट केले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|