तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्या लीवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी इफरा फातेमा शेख (वय 13 वर्षे) ही लीवरच्या गंभीर आजाराने त्रस्त असून, मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

डॉक्टरांनी तीच्या कुटुंबीयांना तातडीने लीवर ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च येणार असून, तीला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदत करुन सहकार्य करण्याचे आवाहन तीचे पालक रुबिना शेख व फारुक शेख यांनी केले आहे.

इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेली इफरा अत्यंत हुशार विद्यार्थिनी असून, इयत्ता 5 वी च्या स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीत तीने स्थान मिळवले होते. ऑलंम्पियाड परीक्षेसह शाळा व शाळाबाह्य स्पर्धेत तीने प्राविण्य मिळवले आहे. सध्या तीच्यावर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे.

तीचे पालक एका पतसंस्थेत दैनंदिन बचत प्रतिनिधी म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना हॉस्पिटलचा एवढा मोठा खर्च पेलवणार नसल्याने त्यांनी मुलीच्या वैद्यकिय उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या वतीने देखील सदर विद्यार्थिनीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदत देऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी शाळेशी अथवा रुबिना शेख 8149699945 व फारुक शेख 9260614876 यांच्याशी संपर्क करावा.

ऑनलाईन मदत पाठविण्यासाठी Ac name- Ifra Fatema Shaikh, Ac. no.- 700701717142567, IFSC code- YESB0CMSNOC (वायईएसबी शून्य सीएमएसएनओसी) या बँक खात्यावर मदत पाठविण्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच मदत मिळवण्यासाठी गुगलवर http://impactguru.com/s/vjLHIv ही लिंक देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe