Maharashtra news : राज्यात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. राजकीय नेत्यांनाही त्याची लागण होत असल्याचे आढळून येत आहे.
भाजपचे नेते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही लागण झाली आहे. फडणवीस यांना करोना होण्याची ही दुसरी वेळ आहे.फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आजारी असल्याने त्यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केला होता.
त्यांनतर तपासणी करून घेतल्यावर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.सध्या राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यासाठी भेटीगाठीही होत आहेत. अशातच फडणवीस यांना करोनाची लागण झाल्यानंतर राजकारण्यांची धाकधूक वाढली आहे.