अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- हैती शहर भूकंपाच्या मोठ्या धक्क्यानं हादरलं आहे. हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला असून या भूकंपात तब्बल या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्थ झालं आहे. तसेच अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी सांगितलं की, या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नासधूस झालं आहे. एक महिन्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
हैती शहराच्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुइस दु सुडमध्ये आहे.
या बेटावर व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेकडून भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत पूरवली जात आहे. दुसरीकडे पुढच्या आठवड्यात हैतीवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम