आशिया खंडातील एकमेव असलेल्या ‘त्या’ धरणासह जिल्ह्यातील ‘ही’ धरणे धोकादायक!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-देशभरातील अनेक धरणाची स्थिती धोकादायक असल्याचा खळबळजनक अहवाल नुकताच संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने दिला आहे.

या अहवालात महाराष्ट्रातील तब्बल दहा धरणांचा समावेश असून, विशेष म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्राच्या त्या संस्थेने दिलेल्या या इशाऱ्याची दखल घेत सरकारने धरणाची तपासणी करून, तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

धारणाचे जसे वय वाढेल तसा धोका आणखी वाढत जातो. आज मितीला राज्यातील जवळपास अनेक धरणे धोकादायक स्थितीत आहेत. जर वेळीच खबरदारी घेतली तर ठीक अन्यथा त्यातून पुढील काळात मोठा अनर्थ घडू शकतो, असे या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधले गेले आहे, याच धरणातील पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेती कारखानदारी बहरली आहे. तर नगर जिल्ह्याच्या सीमेवरील व मराठवाड्यातील जायकवाडी धरण हे धरण आशिया खंडातील सर्वात जुने व सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात ही दोन धरणे भंडारदरा व जायकवाडी धोका असल्याचे सांगितल्याने सरकारने याबाबत तात्काळ शक्य ती पावले उचलावीत अशी मागणी पुढे आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe