अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याला फरार काळात मदत करणारी महिला पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला. आरोपी सुब्बाचारी ही वकील आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ ज. बोठे हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपी बोठे फरार झाला होता. आरोपी बोठे फरार असताना तो हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात लपला होता.
बोठेला तब्बल 102 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली. आरोपी बोठेला फरार काळात मदत करणार्या चार जणांना देखील पोलिसांनी अटक केली.
मात्र त्यातील आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला फरार होती. तिने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













