Pollution under Control : गाडी चालवताना महत्त्वाचे असते ‘हे’ कागदपत्र, नाहीतर भरवा लागतो हजारोंचा दंड

Published on -

Pollution under Control : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत सरकारने पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. वाहन चालकांना आता नोंदणी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि विमा यासोबतच पीयूसी प्रमाणपत्र देखील सोबत ठेवावे लागणार आहे.

हा नियम सर्व वाहनांसाठी बंधनकारक केला आहे. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे दंड टाळण्यासाठी हे कागदपत्र सोबत ठेवा.

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र देतात. ते प्रमाणपत्र फक्त एक वर्षासाठी वैध असते. त्यानंतर तुम्हाला पुन्हा PUC चाचणी करून नवीन प्रमाणपत्र मिळते. 3 ते 6 महिन्यांपर्यंत ते वैध असते.त्यासाठी तुम्हाला 60 ते 100 रुपये मोजावे लागतील.

प्रत्येक राज्याचे पीयूसी प्रमाणपत्र दुसर्‍या राज्यात वैध असते. जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. कशाप्रकारे बनवायचे हे प्रमाणपत्र ते जाणून घेऊयात.

असे मिळवा प्रमाणपत्र

तुम्हाला हे प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर जाऊन बनवावे लागेल. देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रदूषण तपासणी केंद्र असते. परिवहन विभागाकडून ही केंद्र अधिकृत असतात. या प्रमाणपत्रावर एक अनुक्रमांक, लायसन्स प्लेटचा नंबर, वाहनाची चाचणी कोणत्या तारखेला झाली, तसेच एक्सपायरी तारीख, चाचणीची तारीख या सगळ्या गोष्टी असतात.

कशी होते चाचणी

चाचणी करण्यासाठी, सर्वप्रथम वाहनाच्या सायलेन्सरमध्ये गॅस विश्लेषक ठेवावा लागतो. एकदा तपासणी केल्यानंतर संगणकावर डेटा अपडेट होईपर्यंत वाहन चालू ठेवले जाते. कॅमेरा वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घेतो आणि ठराविक मानकानुसार वाहनातून प्रदूषण निघाल्यास पीयूसी प्रमाणपत्र मिळते.

पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र चाचणीची पद्धत खूप वेगळी असते. पेट्रोल गाड्यांसाठी रीडिंग एक्सलेटरच्या दाबाशिवाय एकाच वेळी घेतले जाते तर डिझेल गाड्यांसाठी एस्केलेटर पूर्णपणे दाबून रीडिंग घेतले जाते. हे पाच वेळा केले जाते. यानंतर वाहनातून निघणाऱ्या धुराची सरासरी काढून रिडींग घेतली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe