अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारं 2-DG औषध संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ( डीआरडीओ) विकसीत केलं आहे.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आता 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
2-DG औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटच्या संक्रमणाला रोखू शकतं असा दावा करण्यात आला असून या औषधामुळे विषाणूचं मल्टीप्लिकेशन देखील कमी होतं, असंही नमूद करण्यात आलं आहे. देशात सध्या कोरोना उपचारांसाठी 2-DG औषधाला मान्यता देण्यात आलेली आहे.
2-DG हे औषध सुरुवातीला कोरोनाच्या दोन व्हेअरिंटवर म्हणजेच B.6 आणि B.1.1.7 वर वापर करुन पाहण्यात आलं. पण यात अँटी-व्हायरल गुण असल्यानं हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम