Electric Scooter Discount:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला पेव फुटले असून अनेक इलेक्ट्रिक दुचाकी तसेच कार आणि स्कूटर बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणाची समस्या कमी व्हावी या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे कल वाढत असून सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सध्या दिवाळी सारखा सण तोंडावर येऊन ठेपला असल्यामुळे या कालावधीत अनेक वाहनांची खरेदी केली जाते. कारण मुहूर्त पाहून वाहन घेण्याची क्रेझ आपल्याकडे जास्त असल्यामुळे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड प्रमाणात वाहनांची खरेदी केले जाईल हे डोळ्यासमोर ठेवून काही इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांनी या पार्श्वभूमीवर मोठी सूट देऊ केली आहे. त्यामुळे कोणत्या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वर किती सूट मिळत आहे याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
ओला एस 1 वर मिळत आहे 14,500 रुपयांची सूट
ओला कंपनीच्या एस 1 एअर, एस 1 एक्स प्लस आणि एस 1 प्रो या तीनही व्हेरिएंटवर कंपनीकडून सूट देण्यात आली असून ओला एस 1 एअरवर दोन हजार रुपयांचा फेस्टिवल डिस्काउंट, पाच हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि साडेसात हजार रुपयांचा फायनान्शिअल बेनिफिट मिळत आहे.
या सगळ्या प्रकारची सूट मिळून 14,500 ची सूट या स्कूटर वर मिळत आहे. तसेच ओला एस 1 एअरची एक्स शोरूम किंमत एक लाख पाच हजार रुपये आहे. त्यासोबतच ओला एस 1 एक्स प्लसवर सतरा हजार पाचशे रुपयांची सूट दिली जात असून ओला एस 1 प्रोवर १९५०० रुपयांची सुट मिळत आहे.
एथरवर मिळत आहे 40 हजार रुपयांची घसघशीत सूट
तसेच दुसरी कंपनी म्हणजे एथर एनर्जीने एथर 450X आणि 450S यावर सर्वात मोठी सूट दिली असून दोन्ही स्कूटरवर 40 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. यातील प्रो मॉडेलवर एक हजार पाचशे रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जाणार आहे. कंपनीने ग्राहकांसाठी यामध्ये दोन वर्षाची फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे व त्यामध्ये 5.99% व्याजदर आकारला जाणार आहे.
किती कालावधी करिता आहे ही ऑफर?
दिवाळी सारखा सण डोळ्यासमोर ठेवून ग्राहक 15 नोव्हेंबर पर्यंत या डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत.