अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे वजन तुम्ही ऐकले तर आश्चर्यचकीत व्हाल. एका सफरचंदाच्या वजनापासून ते नवजात बालकाच्या वजनाइतकंच कोरोनाचे वजन आहे.
कोरोना विषाणूंच्या वजनाबाबत इस्त्राईल येथील विजमन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये 3 जूनला प्रसिद्ध झाला आहे.
त जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नमुन्याद्वारे ही गणना केली आहे. कोरोना कालावधीत कोणत्याही ठिकाणी एकावेळी १० लाख ते १ कोटी लोक संक्रमित झाले आहेत. या हिशेबानुसार वैज्ञानिकांनी जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वजनाची गणना केली आहे.
विजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधील डिपार्टमेंट ऑफ प्लॉन्ट अँड एनव्हायरमेंटल सायन्सेस विभागातील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक रॉन मिलो यांनी सांगितलं की, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचे वजन 0.1 ते 10 किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
मात्र कमी वजनाचा विषाणू असेल तर तो कमी धोकादायक असतो, असं होऊ शकत नाही. विषाणूच्या अतिसूक्ष्म वजनाविषयी बोलायचं झालं तर कमीत कमी वजन असलेला विषाणू देखील जगभरात धुमाकूळ घालण्यास पुरेसा आहे.
सध्या जगभरात 17.3 कोटींहून अधिक लोक कोरोनाबाधित आहेत. तसेच 37 लाखांहून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. विषाणूच्या वजन प्रक्रियेसाठी सुरुवातीला माकडांमध्ये कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा दर तपासला.
तोपण अशा वेळी तपासला की ज्यावेळी संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. याचाच अर्थ की शरीरात कोरोना विषाणूचे सर्वाधिक कण अस्तित्वात होते. रॉन आणि त्यांच्या पथकाने फुफ्फुसे, टॉन्सिल्स, लिंफ नोड्स आणि पचनसंस्थेतील कोरोनाच्या प्रमाणाचा अभ्यास केला.
त्यानंतर त्यांनी कोरोना विषाणू कणांची प्रति ग्रॅम पेशी (Cells) या हिशोबाने गणना केली. त्यानंतर त्याची तुलना मानवी शरीरातील पेशींच्या वजनाशी केली. यातून मानवी शरीरात पसरलेल्या कोरोना विषाणूंच्या कणांचे पूर्ण वजन निश्चित करण्यात आले.
यातील कमी वजनाच्या विषाणूंचा अर्थ असा आहे की त्यावेळी संसर्गाचे प्रमाण कमी होते तर 10 किलोग्रॅम वजनाचा अर्थ असा की त्यावेळी जगात कोरोना विषाणू संसर्ग सर्वोच्च पातळीवर होता. मागील गणनेत कोरोना विषाणूच्या व्यासाच्या आधारे एका विषाणू कणाचे वजन 1 फिमॅटोग्राम होते.
मानवी शरीरातील प्रत्येक विषाणू कणाच्या वस्तुमानाची गणना करता तो 1 मायक्रोग्रॅम ते 10 मायक्रोग्रॅम होता. हे आकडे वजा करून शास्त्रज्ञांनी जगभरातील सर्व संक्रमित लोकांच्या सरासरी वजनाची गणना केली. यानंतर या डेटा नुसार कोरोना विषाणूचं वजन काढण्यात आलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम