Mutual funds : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हा’ फंड ठरतो वरदान, आजच करा गुंतवणूक

Published on -

Mutual funds : अनेक ज्येष्ठ नागरिक चांगल्या भविष्यासाठी बँक एफडी किंवा पोस्टात गुंतवणूक करतात. परंतु, अनेकांचं असा समज आहे की म्यूचुअल फंडातील गुंतवणूक कमी परतावा देणारी आणि अधिक जोखमीची असते.

परंतु, या फंडातील गुंतवणूक ही कमी जोखीम आणि जबरदस्त परतावा देणारी असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फंड वरदान ठरतो. त्यामुळे आजच म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करा.

जबरदस्त परताव्यासाठीम्युच्युअल फंड हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स, बाँड्स आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड इत्यादींमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे परतावा बाजारातील चढउतारांवर परिणाम होतो.

चलनवाढीच्या प्रभावापासून संरक्षण

तज्ज्ञांच्या मतानुसार, हा फंड ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीचेही महागाईच्या परिणामांपासून संरक्षण करतो.

  • SIP किंवा एकरकमी पेमेंटद्वारे यामध्ये गुंतवणूक करता येते.
  • ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीत लवचिकता हवी आहे त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरतो

जबरदस्त नफा

मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यामध्ये केलेली गुंतवणूक ही महागाईमुळे प्रभावित होते. जर परताव्याचा विचार केला तर म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर एफडी आणि आरडीपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. परंतु, अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

सध्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ३ ते ७ टक्के व्याज मिळते.
पोस्ट ऑफिस बचत योजनेवर ७.६% परतावा दिला जातो.

संधी: राष्ट्रीय पेन्शन योजनेत 9 ते 12 टक्के व्याज

कधीही गुंतवणूक काढता येते

सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी गुंतवणूकदारांनी डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. तुम्हाला बॅलन्स्ड म्युच्युअल फंडामध्ये पुढच्या पाच वर्षांसाठी नियमित खर्चासाठी पैसे गुंतवता येतात.

गुंतवणूकदाराला कधीही आपली गुंतवणूक काढता येते. इतर कोणत्याही योजनेमध्ये अशी सवलत नाही. हा फंड ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याची परवानगी देतो. – स्वीटी मनोज जैन, गुंतवणूक सल्लागार

त्यामुळे कमी कालावधीत चांगला नफा मिळतो

प्रत्येक म्युच्युअल फंड हा इक्विटी आणि डेटच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची जोखीम बाळगत असतो. त्यामुळे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक म्युच्युअल फंडामध्ये अल्प कालावधीसाठी आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी चांगले क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या शॉर्ट टर्म बाँडमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामधील गुंतवणूक ही बँक एफडीपेक्षा चांगले परतावा देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe