हे सरकार स्थिर असून या सरकारला कोणताही धोका नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आसा आत्मविश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. 

ते रविवारी बारामतीमधील गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे ठराविक मुद्यांवर स्थापन झाले असल्याचे ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार, जयंत पाटील या मंडळींवर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहील याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे सांगून कोणतीही अडचण उद्भवली की तेच मार्ग काढतात,

असे सांगत त्यामुळे हे सरकार स्थिर असून या सरकारला कोणताही धोका नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

आरबीआयकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यावर बोलताना आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल.

परंतु त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागणार आहे. नगरसेवक, आमदार, खासदार यांना सहकारी बँकांचे कार्यकारी संचालक होता येणार नाही,

किंवा पूर्णवेळ संचालक देखील होता येणार नाही, अशी नवीन नियमावली आरबीआयकडून लागू करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News