या सरकारला लाज वाटली पाहिजे : पंकजा मुंडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्यात विविध ठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये आंदोलनात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर टीका केली.

त्या म्हणाल्या, इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सांगितलं. या सरकाने १५ महिने फक्त कोर्टाकडून तारखा घेतल्या. इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करण्यास सांगण्यात आलं.

पण सरकारने कोणताही डाटा तयार केला नाही. यांनी जाऊन कोर्टात स्वीकारलं की ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय. कोर्टानं त्याच दिवशी आरक्षण रद्द केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे,

छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात.

भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “देवेंद्रजी म्हणाले तुम्हाला काही जमत नसलं तर आम्हाला सांगा. असंही तुम्हाला काही जमत नाहीये. जेव्हा मी माठाची तिपई बघते, तेव्हा मला आत्ताचं सरकार दिसतं.

सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे तिपईचं सरकार आहे. त्यावरच्या मटक्यावर सगळे आंदोलनं गार करणं हे सरकारचं कर्तव्य दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe