साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ही गोष्ट अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.

सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात प्रवेश करताना यापुर्वी करण्यात आलेले नियम नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

तसेच साईंच्या दर्शनाकरीता साधारणपणे 15000 भाविकांना दर्शन देता येईल. त्यामुळे साईभक्तांनी दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे,

असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने करण्यात आलेले आहे. दर्शनासाठी येण्यापूर्वी दर्शनपास आवश्यक

शिर्डी येथे दर्शनाकरीता येतानी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे.

ऑनलाईन पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. online.sai.org.in या वेबसाईटव्दारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा

आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील 05 दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून

पुढील 02 दिवसांसाठी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी संस्थानच्या www.sai.org.in या संकेतस्थळावर संपर्क करावा.