अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या आनंदाच्या क्षणाची आठवण रहावी, यासाठी त्या व्यक्तीची आवडणारी वस्तू भेट देतो. मात्र पाथर्डी नगरपालिकेला नागरिकांनी एक अनोखी भेट दिली आहे.
पाथर्डी शहरात सार्वजनिक मुतारी असावी, यासाठी मुकुंद गर्जे व अमोल गर्जे यांनी नगरपालिके विरोधात उपोषण केले होते. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष यांनी आठ दिवसात शहरातील मुतारीचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते.

मात्र दोन महिने उलटूनही मुतारीचे काम सुरू झाले नाही. त्याच्या निषेधार्थ गर्जे यांनी प्रतीकात्मक मुतारी तयार करून शहरातून तिची सवाद्य मिरवणूक काढली व प्रतिकात्मक उद्घाटन केले. त्यांनतर ही प्रतिकृती पालिका पदाधिका-यांना भेट दिली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|