अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या पती-पत्नी एकत्रीकरणासह इतर आंतरजिल्हा बदल्या शासन नियमांमध्ये रखडल्या आहेत.
शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्यासाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांकडे आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.
मागील सरकारने बंद केलेली आपसी आंतरजिल्हा बदली पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही आमदार लंके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ना हरकत प्रमाणपत्र मिळालेल्या शिक्षकांमध्ये पती- पत्नी ६० टक्के व इतर ४० टक्के हे प्रमाण ठरविण्यात यावे.१० टक्के रिक्त जागेची अट रद्द करण्यात यावी करावी.
शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्याबाबत वरील मुद्द्यांचा विचार करून, नुकताच पारीत झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली शासन निर्णयामुळे दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पती-पत्नींवर अन्याय होत आहे.
शासन निर्णयातील पान क्र. ४ वरील मुद्दा क्रमांक ८.१ मुळे विभक्त पती पत्नी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत.अनेक पती-पत्नी शिक्षक विभक्त राहून नोकरी करीत आहेत.
त्यामुळे त्यांचे कुटूंब विस्कळीत झाल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण, वयोवृद्ध माता-पित्यांची देखभाल सह आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याचा परिणाम शिक्षकांच्या मानसिकतेवर व गुणवत्तेवर होत आहे.दिनांक ७ एप्रिल २०२१ च्या आंतरजिल्हा शासन निर्णयात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
यामध्ये माजी सैनिक पत्नी जीआर प्रमाणे ज्या महिला स्वजिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात नोकरी करीत आहेत. अशा महिलांची विनाअट बदली करण्यात यावी.
तसेच १० टक्के रिक्त जागेची अट रद्द करण्यात यावी करावी. शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्याबाबत या मुद्द्यांचा विचार करून आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून शुद्धीपत्रक काढावे, अशी मागणी आमदार लंके यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|