मुंबई- बॉलीवूडमध्ये हेरा फेरी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांनी या सिनेमाला डोक्याला उचलून घेतले. या यशानंतर हेरा फेरी २ हा सिनेमा आला. तो हि प्रचंड गाजला. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती हेरा फेरी ३ या सिनेमाची.
मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत या तिस-या भागाची अधिकृत घोषणा केलेली नाही. हा सिनेमा का रखडला आहे याचं कारण अभिनेता सुनील शेट्टी याने सांगितलं आहे. सुनील शेट्टी म्हणाला, सध्यातरी या सिनेमाच्या बाबतीतलं सगळं काम थांबलं आहे.
चाहते हेरा फेरी ३ची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र हा सिनेमा काही अडचणींमधून जात आहे. जशा या सिनेमाच्या काही अडचणी दुर होतील तसं लगेचच हा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर केला जाईल हेरा फेरी २००० मध्ये रिलीज झाली होती.
हा सिनेमा प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. ज्यात अक्षय, सुनील, परेश रावल आणि तब्बु हे कलाकार होते. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग हेरा फेरी २ हा २००६ मध्ये रिलीज झाला होता.
नीरज वोराने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात याच तीन कलाकारांनी काम केलं होतं. २०१७ मध्ये नीरज वोरा यांनी हेरा फेरी ३ ची घोषणा करताना या तीनही कलाकारांना न घेता जॉन अब्राहम
अभिषेक बच्चन आणि नाना पाटेकर यांना घेऊन सिनेमा करणार असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यानंतर नीरज वोरा यांचं निधन झालं. २०१८ मध्ये इंदर कुमार यांनी हेरा फेरी ३ दिग्दर्शित करणार असल्याची घोषणा केली आणि पुन्हा अक्षय, सुनील आणि परेश रावल यांना मुख्य भूमिकेत घेण्याचा निर्णय घेतला होता.