ही वेळ कुणाला घरी आमंत्रण देण्याची नव्हे, तर घरात राहण्याची अन‌् घरातही मास्क वापरण्याची!

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-ही वेळ कुणालाही घरी आमंत्रण देण्याची नाही, तर घरातच राहण्याची आणि लोकांनी घरात देखील मास्क वापरण्याची आहे.

तसेच, या कोरोना काळात कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका आणि मास्क वापरणं अतिशय आवश्यक आहे. तसेच, कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळल्यास घरातच विलगीकरणात रहावं, असे आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी केले आहे.

भारतावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं मोठं संकट ओढावल्याचं चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सरकारकडून नागरिकांना सूचक इशारा देण्यात आला.

आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, जर दोन व्यक्ती मास्क वापरत नाही व सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नसतील तर यामुळे कोरोना संसर्गाचा धोका ९० टक्के वाढू शकतो.

जर मास्कचा वापर केला आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत असतील तर धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. जर सूचनांचे पालन केले गेल तर एक बाधित रूग्ण ३० दिवसांमध्ये ४०६ लोकांना बाधित करण्याची शक्यता आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, कोरोनाची प्रारंभीची लक्षणं दिसल्यास स्वतःचे तत्काळ विलगीकरण करून घ्या. रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहू नका.

अशावेळी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येण्याची देखील शक्यता आहे. मात्र तरी देखील लक्षणं पाहता स्वतःला संसर्ग झाला असल्याचे समजा आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News