कोविड सेंटरमध्ये घडलेली ‘ही’ घटना जिल्ह्यातील पहिलीच

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याची चर्चा सुरू असताना पाथर्डीतील एका कोविड केअर सेंटरमधून 4 बालकांनी करोनावर यशस्वी मात केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दोन आणि तिनखडी येथील दोन भावंडांना करोनाचा संसर्ग झाला होता.

त्यांना सुमनताई ढाकणे कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात आले. केंद्रात दाखल झाले तेव्हा या लहानग्यांना प्रचंड अशक्तपणा होता, नीट उभेही राहता येत नव्हते, पालकही घाबरलेले होते.

अशाही परिस्थितीत केंद्रातील डॉक्टरांनी पालकांची संमती घेऊन उपचाराचे आव्हान स्वीकारले. मुलांनी उपचाराला प्रतिसाद दिला. आठ दिवसांत ही बालके बरी झाली.

एखाद्या कोविड सेंटरमधून एकाचवेळी चार मुले बरी होऊन परतण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. दरम्यान उपचारांनंतर कोविड सेंटरच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.

दरम्यान, या मुलांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांनाही करोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News