विहिरीत सापडला हा विषारी प्राणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जामखेड शहराजवळील एका विहिरीत पडलेल्या अतिविषारी असलेल्या घोणस जातीच्या नर मादी सापानां वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहराजवळील बोराटे वस्ती येथील नवनाथ बोराटे यांच्या शेतातील विहिरीत अतिविषारी असलेल्या घोणस जातीच्या नर मादी साप पडलेले असल्याचे पक्षीमित्र दीपक थोरात यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी तात्काळ घटनचे माहिती वन विभागास कळविली.

जामखेड येथील वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहीर खूप खोल असल्याने या सपना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अथक प्रयत्नानंतर अखेर या सापांना बाहे काढण्यात आले.

दरम्यान हे घोणस साप विषारी प्रजातीचा असल्याने वनमजूर ताहेरअली सय्यद यांनी मोठ्या शिफातीने साप सुरक्षित बाहेर काढले असून घोणस सापांच्या जोडीच्या सध्याचा काळ हा मिलनकाळ असल्याने ते विहिरीत पडले असण्याची शक्यता आहे.

घोणस पाण्यात फार काळ राहू शकत नाही. आम्ही ही जोडी पकडली असून, त्यांना लवकरच त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडून देणार असल्याचे वनमजूर ताहेरअली सय्यद यांनी सांगितले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News