Jio Best Plan under 1000 : रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर करत असते. त्यातच या स्वस्त प्लॅन्समुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. काही दिवसांपासून या कंपनीने आपली 5G सेवा सुरु केली आहे.
ही सेवा जरी सुरुवातीला काही शहरांमध्ये सुरु झाली असली तरी ती लवकरच सर्व शहरात सुरु होणार आहे. काही ग्राहक जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात. आता जिओकडे जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन आहे. पाहुयात सविस्तर.

जर तुम्हाला 1 वर्षासाठी रिचार्ज करायला आवडत असेल किंवा तुम्ही अधिक वैधता तसेच अधिक फायदे देणारा प्लॅन शोधत असाल तर तुम्ही आता सर्वात लोकप्रिय असणारा Jio चा प्लॅन घेऊ शकता. जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर.
336 दिवस वैधता असणारा प्लॅन
जिओने 336 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन ऑफर केला आहे. या प्लॅनची किंमत 899 रुपये इतकी असून वैधता 28 दिवसात 12 सायकल्सच्या स्वरूपात येतो. तर यामध्ये प्रत्येक 28 दिवसांसाठी 2GB डेटा उपलब्ध असणार आहे, जो एकूण 24GB डेटाच्या सुविधेसह येतो. या प्लॅनची डेटा मर्यादा संपल्यानंतर, याचा इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.
Jio च्या 899 प्लॅनचे फायदे पहा
जर कंपनीच्या 899 रुपयांच्या प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात दर 28 दिवसांनी 50 SMS ची सुविधा मिळते. यात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या प्लॅनमध्ये JioCloud, JioCinema, JioTV, JioSecurity सारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश उपलब्ध असणार आहे.
या वापरकर्त्यांना घेता येणार लाभ
कंपनीच्या 899 रुपयांच्या प्लॅनचा फायदा फक्त JioPhone वापरकर्त्यांना होणार आहे. तसेच 899 रुपयांचा हा प्लॅन फक्त Jio च्या त्या नंबरवर देत आहे जे Jio फोनवर वापरत आहेत. समजा जर तुमच्याकडे जिओचे सिम आणि जिओचा फोनही असेल तर 899 रुपयांचा रिचार्ज करून तुम्ही 336 दिवसांसाठी उपलब्ध लाभांचा लाभ घेऊ शकता.