१ जानेवारी २०२५ : पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात. मनुष्य हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानला जातो. वैज्ञानिक नेहमीच असा दावा करतात की, कधी ना कधी पृथ्वीचा नाश होईल आणि पृथ्वीवरून मनुष्य प्राणी लुप्त होईल. अशात अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्याचे अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा कोणत्या जीवाचं राज्य असेल? या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकांनी दिले आहे.
सगळीकडे राहण्यास सक्षम
वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, मानवी अस्तित्व नष्ट झाल्यावर किंवा संपल्यावर पृथ्वीवर ऑक्टोपस महत्त्वाचे राहतील. वैज्ञानिकांनुसार, ऑक्टोपस जीव बुद्धिमान आहेत. पाण्यात राहणारा हा जीव पृथ्वीवर सगळीकडे राहण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कारण त्यात समस्या सोडवण्याची, शिकण्याची क्षमता जास्त आहे. हेच कारण आहे की, हे जीव इतर जीवांपेक्षा वेगळे आहेत.
ऑक्टोपसचे वैशिष्ट्य
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टिम कॉलसन म्हणाले की, ऑक्टोपस सगळ्यात जास्त बुद्धिमान जीव आहे आणि त्यांच्यात एकमेकांसोबत संवादाची क्षमताही जास्त आहे. तसेच त्यांच्यात शिकण्याची इच्छा जास्त आहे. इतकेच नाही तर ते आपल्या कामात निपुण असतात.
त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे मनुष्याचे अस्तित्व नष्ट झाल्यावर ते पृथ्वीवर सर्वत्र दिसू शकतील. प्रोफेसर पुढे म्हणाले की, ऑक्टोपस खऱ्या आणि आभासी गोष्टींतील फरक ओळखणे आणि कोडी सोडवण्यातही पटाईत आहेत. ते आपल्या पर्यावरणात चपखल बसतात.