अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- एमआयडीसीत एका कंपनीतील घरात घुसून स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. तसेच यावेळी आरोपींना अडवणूक करणाच्या महिलेचा पती व मुलाला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, पीडित महिला एमआयडीसी येथे राहत असून, तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता कंपनीत असलेल्या घरात ती स्वयंपाक करीत होती. यावेळी कंपनीचे गेट व भिंतीवरून उड्या मारून सदर आरोपी स्वयंपाक करीत असलेल्या ठिकाणी आले.
तू आमच्या घरी कामाला चल, तुला इथल्यापेक्षा जास्त पगार देवू असे म्हणाले. मात्र पीडित महिलेने त्यांना बरोबर येण्यास नकार दिला.याचा राग येऊन त्यापैकी एका व्यक्तीने अंगाला झटून चावी काढून घेत कंपनीचे कार्यालय उघडून सीसीटीव्ही कॅमेरा, संगणक, ऑफिसचे केबीन व खिडक्यांची तोडफोड केली.
त्यांच्या पाठीमागे गेले असता, या मधील काही व्यक्तींनी कपडे फाडून विनयभंग केला. तर शिवीगाळ करुन मारहाण केले. सदर आरोपींची अडवणूक करणाऱ्या आरोपींनी पती व मुलाला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून पसार झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|