Maharashtra news : कोरोना काळातील दोन वर्षांच्या खंडानंतर राज्यातील पालख्या आणि दिंड्या यावर्षी पुन्हा उत्साहात निघाल्या आहेत.
मात्र, राज्यातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेली श्रीक्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या दिंडीचा सोहळा यावर्षी होणार नाही.प्रथा सुरू ठेवायची म्हणून मोजकेच दहा-पंधरा वारकरी पादुका घेऊन पढंरपूरला जाणार आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून हा दिंडी सोहळा सुरू आहे. यावर्षी त्याला वेगळा संदर्भ होता. देवगडच्या श्री दत्त मंदिर देवस्थान श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रकाशानंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी सूत्रेही स्वीकारली आहेत. यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीचा पहिला दिंडी सोहळा आहे. त्यामुळे तो कसा असणार याकडे लक्ष लागले होते. मात्र देवस्थानने यावर्षी मोठा सोहळा न करता मोजक्याच वारकऱ्यांची दिंडी नेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार देवगड येथून दिंडी मार्गस्थ झाली आहे.
दिंडीमध्ये फक्त सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका दर्शनासाठी बरोबर घेण्यात आलेल्या आहेत.