अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मान्सून महाराष्ट्रासह देशभरात दाखल झाला. मात्र, आता नंतर पावसाने बर्याच भागात खंड घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मात्र, पुढील दोन दिवसात अनेक भागात तुरळकसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे.
देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर मात्र पावसाने काही ठिकाणी उघडीप दिली आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. मात्र, पाऊस होत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, आता पुढील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.
काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल असा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तर विदर्भात अनेक ठिकाणी अनेक मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तर बहुतांश राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. दरम्यान बळीराजा देखील मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहतो आहे. कारण पेरणीची बहुतांश कामे पावसावर अवलंबून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम