अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रामध्ये सोमवारपासून कोरोना लसीकरण मोफत केले जाणार आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने काही अटी-शर्ती घातल्या असून, ज्या आरोग्य केंद्रांमध्ये नेट कनेक्ट नसेल, ज्या आरोग्य केंद्राचे बांधकाम चांगले नसेल, ज्या आरोग्य केंद्रांमध्ये कमी मनुष्यबळ असेल, अशा ठिकाणी लसीकरण करू नये अशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे.
नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, तिसऱ्या टप्प्यात ६० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना व ४५ वय असलेल्या गंभीर रुग्णांना कोरोना लस देण्याचे काम सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला मात्र दुसऱ्या टप्प्यापासून लसीकरणाला काहिसा प्रतिसाद वाढला. जिल्ह्यासाठी आतापर्यंत कोविशिल्ड व कोवॅक्सिन अशा दोन्ही लस उपलब्ध झालेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोविशिल्ड लस मिळाली होती.
त्यानंतर कोव्हॅक्सीन मिळाली होती. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार होती. मात्र, तीस हजार कर्मचारी यापेक्षा कमी जणांना लस दिल्याने प्रशासनाला दुसरा टप्पा सुरू करावा लागला. दुसऱ्या टप्प्यात आरोग्य विभागाने महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांना लस देणे सुरू केले. आता तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे काम सुरू झाले.
विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयासह नगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या ही लस उपलब्ध झाली निश्चित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार बुधवार व शुक्रवारी हे लसीकरण होणार आहे. अकोले तालुक्याच्या भागात अनेक ठिकाणी नेट कनेक्टिव्हीटी नाही त्यामुळे या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|