अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद शाळेत बसवलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा एलईडी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संच अज्ञात चोरटयांनी शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून लंपास केला होता.
मात्र या तिघा भामट्यांना कर्जत पोलिसानी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. स्वप्निल गायकवाड, गणेश निंबाळकर, निखील पवार, शुभम उर्फ भूंग्या गायवाड ( तिघेही रा.बेलगाव ता.कर्जत) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधीक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे एलईडी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संच चोरट्यांनी चोरुन नेला होता.
कर्जत पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तसेच या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय खबऱ्याकडून सदरचा गुन्हा स्वप्निल गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेत स्वप्निल गायकवाड याला पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा गणेश निंबाळकर ,
निखील पवार, शुभम उर्फ भूंग्या गायवाड या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. या सर्वाना चोरीस गेलेल्या मालासह त्यांना पकडले आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम