अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- नगर – देशाची राजधानी दिल्ली येथील नागल या भागातील दलित असलेल्या 9 वर्षीय बालिकेस काही नराधमांनी अतिप्रसंगी करुन तिची हत्या केली. या विरोधात नगरमध्ये शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध करुन आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, शहराध्यक्ष आदेश बचाटे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान, उपाध्यक्ष कुणाल बैद, सनी खरारे, राहुल लखन, अतुल अपील, आतुल नळवाल, आनंद बग्गल, सिद्धार्थ बिलखास,
मुकेश हंस आदि उपस्थित होते. यावेळी अनिल शेकटकर म्हणाले, दिल्ली येथे झालेल्या प्रकार हा दलित समाजावर मोठा आघात आहे. दलितांवर वारंवार अन्याय, अत्याचार होत आहे. ही शासन व समाजाच्यादृष्टीने लज्जास्पद बाब आहे. तरी सरकाने यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे.
संतोष नवसुपे म्हणाले, देशातील विविध राज्यात वारंवार काही समाज विकृत लोकांकडून अशा घटना घडत असतात. भारतीय संस्कृतीत स्त्रीला दैवत मानले आहे. त्यामुळे स्त्रीयांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्यासमोर स्त्रीवर अन्याय होत असल्यास त्यास विरोध केलाच पाहिजे.
अशा विकृत लोकांना फाशी शिवाय जबर बसणार नाही. शिव राष्ट्र पक्ष या घटनेचा निषेध करुन आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मोहन बुलाखे, विशेंद्र पवार, गणेश शेकटकर, सचिन डफळ, अजय पठारे, अभय शेकटकर, बाळासाहेब जगधने, दत्तज्ञत्रय घोडके आदिंसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर पदाधिकार्यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम